सातारा

Wai news: वाईतील जुनं पोलिस ठाणे बनलंय भूतबंगला

नवीन इमारत सुसज्ज पण लॉकअप्‌‍च नाही : भुईंजला मारावे लागताहेत हेलपाटे

पुढारी वृत्तसेवा

वाई : वाई येथील जुन्या विभागीय पोलीस ठाण्याची दूरवस्था झाली आहे. जागोजागी कचरा साचला असून बकाल अवस्था निर्माण झाली आहे. पोलिस ठाण्यासाठी नवीन इमारत बांधण्यात आल्यामुळे या जुन्या इमारतीकडे दुर्लक्ष झाले असून त्याची अवस्था भुत बंगल्यासारखी बनली आहे. दरम्यान, नव्या बांधलेल्या इमारतीत लॉकअप सुविधा बंद असल्यामुळे संशयित आरोपींना भुईंज पोलीस ठाण्यात हलवण्याची वेळ वाईच्या पोलिसांना आली आहे.

नवीन पोलिस ठाण्यात सुविधा असल्या तरी जुने पोलीस ठाणे म्हणजे अक्षरश: कचरा कुंडी बनले आहे. परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, झाडलोट व देखभालीचा अभाव दिसून येतो. भिंतींवर गुटखा व तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी विद्रूप अवस्था निर्माण झाली आहे. अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून पोलिस कर्मचाऱ्यांनाही काम करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जुन्या इमारतीचा योग्य वापर करून परिसर स्वच्छ व सुस्थितीत ठेवावा, अशी मागणी होत आहे. वाई पोलीस ठाण्याची ही गंभीर अवस्था लक्षात घेता संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांची व पोलिसांची होणारी गैरसोय दूर करावी, असा सूर आळवला जात आहे.

दरम्यान, नव्याने बांधलेल्या पोलिस ठाण्याच्या इमारतीमध्ये प्रशस्त व सुसज्ज नवीन इमारत उभी राहूनही लॉकअप सुविधा अद्याप कार्यान्वित करण्यात आलेली नाही. विभागीय पोलीस ठाण्यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी अशी मूलभूत सुविधा नसणे हे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे द्योतक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT