सातारा : वाई तालुक्यातील वेळे या गावाने पाणीदार गाव अशी ओळख निर्माण केली आहे. शाश्वत विकास आराखड्यावर धोरणात्मक काम या गावाने केले. लोकसहभागातून गावाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी वेळे ग्रामपंचायतीच्या वतीने प्रेरणादायी स्नेहमेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात गावातील ग्रामस्थांनी शाश्वत विकासाचा द़ृढ संकल्प करून सर्वांगीण विकास करणारे वेळे गाव अशी ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला.
ज्ञानदीप सोसायटीचे अध्यक्ष, मुंबई जिल्हा बँकेचे संचालक व वेळे गावचे सुपुत्र जिजाबा पवार यांचे मार्गदर्शन वेळोवेळी गावास मिळत आहे. वेळे गावच्या जलसंधारणास संस्थेने 4 लाखाचे भरीव योगदान दिले आहे. यावेळी पंचायतराज प्रशिक्षक विद्याधर गायकवाड, नाम फाऊंडेशनचे बाळासाहेब शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
या मेळाव्यात सरपंच अर्चना गायकवाड, उपसरपंच राहुल ननावरे, ज्ञानदीप सोसायटीचे संचालक एकनाथ जगताप, रवींद्र केंजळे, बाळासाहेब वाजळे, निवृत्ती म्हस्के, मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण चव्हाण, गणेश गायकवाड, यशोधन ट्रस्ट अध्यक्ष रवी बोडके, लक्ष्मण डेरे, माजी सरपंच विश्वास पवार, मुंबई सहकारी बोर्ड संचालक हंबीरराव पवार, अनिल पवार, बी. के. पवार, सुरेश पवार, ग्रामविकास अधिकारी श्रुतिका जाधव, ग्रामपंचायत कार्यकारिणी दरशरथ पवार, दिपक पवार, विजय पवार, निलम नलावडे, माजी उपसरपंच उषा पवार, गोविंद पवार, महादेव भिलारे, सतीश ढमाळ, सिताराम जाधव, मंगल मोरे, शालन पवार, बजरंग पवार, स्वप्नील कागडे, स्वप्निल जाधव, अक्षय भिलारे, गणपत भिलारे, दीपक सोनवणे, भानुदास पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
दुष्काळाच्या झळा सोसून 8 दिवसाला गावाला पाणीपुरवठा करताना स्वतःचे पाणी स्वतः निर्माण करण्यासाठी ग्रामस्थांनी गतवर्षी कंबर कसली. सातत्याने 65 दिवस श्रमदान करून 14 किलोमीटर डीपसीसीटी तसेच 40 मातीबांध निर्माण केले. विद्याधर गायकवाड यांचा सत्कार करताना ज्ञानदीपचे अध्यक्ष जिजाबा पवार, यावेळी सरपंच अर्चना गायकवाड, लक्ष्मणराव डेरे, विश्वास पवार व इतर.