Udayanraje Bhosale Meets Ashwini Vaishnaw 
सातारा

Udayanraje Bhosale Meets Ashwini Vaishnaw: खा. उदयनराजे यांनी घेतली रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट

रेल भवन येथे भेट घेऊन चर्चा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांची रेल भवन येथे भेट घेऊन चर्चा केली.

जरंडेश्‍वर स्थानकावर ११०३९/ ११०४० व ११४२५/ ११४२६ गाड्यांना थांबा देण्याची, तर कराड येथे १६५३३/ १६५३४, ११०४९/ ११०५० व २०६६९/ २०६७० गाड्यांना थांबा देण्याची मागणी करण्यात आली. सातारा येथे १९६६८/१९६६७, २२६८५/२२६८६ व १२६२९/ १२६३० गाड्यांना थांबा देण्याबरोबरच दादर-हुबळी एक्सप्रेसचा थांबा पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली.

सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यंत पूर्ववत करावी, दादर-सातारा एक्सप्रेस दररोज चालवावी आणि राणी चेनम्मा एक्सप्रेस साताऱ्यापर्यंत वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली. या मागण्यांवर रेल्वेमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकर निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT