कराड : सहापदरीकरणाअंतर्गत कराड येथे सुरू असणार्या उड्डाण पुलाच्या भराव कामासाठी व सेवा रस्त्यासाठी हॉटेल पंकज येथील पार्किंगजवळ असणारी झाडे तोडण्यात आली आहेत. कोयना पुलापासून संरक्षक भिंत बांधण्याचे काम हॉटेल पंकज पर्यंत आले आहे. सर्व्ह्सि रस्त्यासाठीची तयारी सुरू करण्यात आल्याने कोल्हापूर नाक्यावर वाहतूक कोंडी होत असून अपघाताचा धोका निर्माण झाली आहे.
कोल्हापूर नाक्यावर उड्डाण पुलाच्या भरावाचे काम गतीने सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर नाक्यावरील जाधव आर्केडजवळ कराड शहरात येणारा बंद करण्यात आला आहे. याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. त्यातच कोल्हापूर नाक्यावरील आयलँड समोर शहरात येण्यासाठी नव्याने मार्ग करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर दिशेला जाणार्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. ठेकेदार कंपनी, कराड वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी तैनात करणे गरजेचे आहे. कराड शहरात येण्यासाठी जुना मार्ग बंद करून नवीन मार्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच उड्डाण पुलाच्या भरावाचे काम सुरू असल्याने हॉटेल पंकज ते हॉटेल संगम दरम्यान वाहतूक धोकादायक बनली आहे. कराड शहरात येणारी व कोल्हापूरकडे जाणारी वाहने एकमेकांना पास करून जात आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे.