सातारा

सातारा : व्याघ्रप्रकल्प पुनर्वसनाचा प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावणार : जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

मोनिका क्षीरसागर

बामणोली; पुढारी वृत्तसेवा : खिरखंडी तालुका जावली येथील सह्याद्री व्याघ्रप्रकल्पांतर्गत काही खातेदारांचे पुनर्वसन झालेले असून, त्यापैकी सहा खातेदार हे अद्यापही मूळ खिरखंडी या गावी वास्तव्य करत आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. या खातेदारांच्या कुटुंबाचा आणि त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याची दखल घेत जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी व्याघ्रप्रकल्प पुनर्वसनाचा प्रश्न येत्या आठ दिवसांमध्‍ये मार्गी लावणार असल्याचे आश्वासन उर्वरित खातेदारांना दिले आहे.

व्याघ्रप्रकल्प पुनर्वसनासंदर्भात मुंबई उच्‍च न्‍यायालयात सुमोटो याचिका दाखल होती. याचा पाठपुरावा सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केला. या व्याघ्रप्रकल्पांतर्गतील खिरखंडी येथे भेट देत काही खातेदारांशी चर्चा केली. येथील परिस्थितीची माहिती घेत याविषयी समस्या आठ दिवसांमध्‍ये मार्गी लावणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT