सातारा : किल्ले अजिंक्यतारा रस्त्यावर मातीचा ढिगारा बाजूला करून बॉक्सपेटी सुरक्षित अंतरावर बसवण्यात आली.  Pudhari Photo
सातारा

सातारा : धोकादायक डीपीची झाली अखेर दुरुस्ती

दै.‘पुढारी’च्या दणक्यामुळे कार्यवाही : मातीचा ढिगारा केला बाजूला

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुढारी वृत्तसेवा

किल्ले अजिंक्यताराकडे जाणार्‍या रस्त्याकडेचा मातीचा भराव ढासळल्याने रस्त्याकडेला उभारण्यात आलेला महावितरचा डीपी धोकादायक बनला होता. याबाबत दैनिक ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध करताच महावितरणने त्याची दखल घेत याठिकाणचा मातीचा ढिगारा बाजूला करून बॅाक्सपेटी सुरक्षित अंतरावर बसवली.

गेल्या दोन महिन्यापासून सातारा शहरासह जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे. सध्या पावसाने उघडीप दिली आहे. किल्ले अजिंक्यतार्‍याकडे जाणार्‍या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. या रस्त्यावर असणार्‍या महावितरणच्या डीपी नजीकचा मातीचा भराव ढासळला होता. अनेक मोठे दगड रस्त्यावर आल्याने डीपी धोकादायक बनला होता. त्यामुळे दुर्घटना घडण्याची भीती होती. याबाबत दैनिक ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध करताच महावितरणने त्याची दखल घेतली. तत्काळ याठिकाणचा मातीचा ढिगारा बाजूला करून बॉक्सपेटी सुरक्षित अंतरावर बसवण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT