साऊंड सिस्टिम Pudhari Photo
सातारा

Satara News : सातार्‍यात साऊंड सिस्टीमवरील कारवाईनंतर तणाव

पोलिसांकडून ३ गुन्‍हे; मोती चौकात ठिय्या आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा शहरात शनिवारी अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त ठिकठिकाणी मिरवणुका निघाल्या. यावेळी शाहू चौक व मोती चौकात रात्री १० नंतर साऊंड सिस्टीम बंद करण्यासाठी पोलिसांनी बळ वापरले. त्यावरून मोती चौकात आरपीआयच्या विविध गटांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवला. संतप्त पदाधिकाऱ्यांनी थेट ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी साऊंड सिस्टीमप्रकरणी एकूण ३ गुन्‍हे दाखल केले आहेत.

मोती चौक परिसरात शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास साऊंड सिस्टीमवरील पोलिसांच्या कारवाईवरून वातावरण तापले. पोलिसांनी साऊंड सिस्टीमवर कारवाई सुरू करताच रिपब्लिकन सेना संघटनेचे कार्यकर्ते तसेच संबंधित सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. यावेळी पोलिसांसोबत कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांची भूमिका जाणून घेतली तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन केले. काही काळ चर्चेनंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या घटनेदरम्यान कोणतीही मोठी अनुचित घटना घडली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT