तारळे : यंदा सलग सुरु झालेल्या पावसामुळे तारळी धरणातील एकूण पाणी साठा 99 टक्के झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. धरणातील पाणी साठा नियंत्रित ठेवण्यासाठी खुले केलेले गेट बंद करण्यात आले आहे.
तारळे विभागात मुरुड गावानाजिक तारळी धरण असून त्याची पाणी साठवण क्षमता 5.85 टीएमसी एवढी आहे. या धरणाच्या पाण्यावर तारळे विभागासह कराड, माण तालुक्यातील शेती ओलिताखाली येणार आहे. या पाण्याद्वारे हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत असते. उपसा सिंचन, बंदिस्त कालव्याद्वारे पाणी वितरण केले जाणार आहे.
यंदा मे महिन्याच्या मध्यावर सूरू झालेल्या पावसाने विश्रांती घेतली नाही. यामुळे लवकरच धरण भरले होते. आज अखेर धरण पाणलोट क्षेत्रात 1400 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. आठवडाभरापासून पावसाचा जोर मंदावला आहे. पण पावसाची रिमझिम सुरुच आहे. तारळी धरणात सध्या 99 टक्के इतका पाणी साठा आहे.