फलटण : तडीपारी आदेशाचे उल्लंघन करणार्‍या संशयितांना फलटण पोलिसांनी अटक केले. Pudhari Photo
सातारा

Satara Crime News | तडीपारी आदेशाचे उल्लंघन; सरडे येथील चौघांना अटक

फेब्रुवारी 2025 मध्ये दोन वर्षाकरता सातारा व पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते

पुढारी वृत्तसेवा

फलटण : तडीपारी आदेशाचे उल्लंघन करुन गावात वावरत असलेल्या चौघांवर गुन्हा नोंदवून त्यांना फलटण पोलिसांनी अटक केली.

रोहित भिमराव जाधव, ऋत्विक दत्तात्रय जाधव, विशाल बाळासो जाधव, सुरज शिवाजी बोडरे (सर्व रा. सरडे ता. फलटण) अशी संशयितांची नावे आहेत. या चौघांना फेब्रुवारी 2025 मध्ये दोन वर्षाकरता सातारा व पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन मोहीम सुरु आहे. या मोहिमेंतर्गत फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत तडीपार गुन्हेगारांनी पुन्हा गावात अनधिकृतपणे प्रवेश केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी कारवाई करुन संशयितांना अटक केली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सुनील महाडिक, पोलिस उपनिरीक्षक जी. बी. बदने, पोलिस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, हनुमंत दडस, अरुंधती कर्णे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT