Satara Crime: फसवणूक व मारहाण प्रकरणातील संशयितांना अटक Pudhari Photo
सातारा

Satara Crime: फसवणूक व मारहाण प्रकरणातील संशयितांना अटक

लोणंद पोलिसांनी पुणे व उपळवे येथून संशयितांची उचलबांगडी केली

पुढारी वृत्तसेवा

लोणंद : लोणंद पोलिसांनी विविध दोन गुन्ह्यांमध्ये दोघांना अटक केली. दोघांनाही पाच वर्षांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

गुंतवणुकीची रक्कम दहा महिन्यांत दामदुप्पट करून देतो, असे आमिष दाखवून फसवणूक करणार्‍या संशयिताच्या मुसक्या आवळल्या. संदीप सोपान येळे (वय 43, रा. पारोडी, ता. शिरुर, जि. पुणे) असे फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला दि. 3 पर्यंत पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. तर दुसर्‍या एका गुन्ह्यात जुन्या भांडणाच्या कारणातून मारहाण करणार्‍या किशोर ऊर्फ अभय छगन भोसले (वय 36 रा. कोळकी फलटण) यालाही अटक करण्यात आली आहे. किशोरला पोलिसांनी उपळवे येथून अटक केली.

सपोनि सुशिल भोसले, पोलिस उपनिरीक्षक रोहित हेगडे, सहा. फौजदार विजय पिसाळ, विष्णु धुमाळ, दिलीप येळे, हवालदार नितीन भोसले, सतिश दडस, महेश टेकवडे, बापुराव मदने, पोलीस अंमलदार विठ्ठल काळे, अवधूत धुमाळ, अंकुश कोळेकर, अमोल जाधव, सचिन कोळेकर, जयवंत यादव, संजय चव्हाण, राहुल राउत, राहुल कवठे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT