उंडाळे : सापाबाबत आपणास परिपूर्ण माहिती नसते आणि अंधश्रद्धेतूनच सापांचा नाश केला जातो. मात्र, निसर्ग संतुलनासाठी साप महत्त्वाचा घटक असल्याचे सांगत सर्पमित्रांकडून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीचा प्रयत्न करण्यात आला.
येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक विद्यालयात सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांच्या मार्गदर्शनाखाली सापांविषयी जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्राचार्य बी. आर. पाटील, पर्यवेक्षक जे. एस. माळी, ए. एन. ओ. धनजय पवार, शंकर आंबवडे, आनंदराव थोरात यांची उपस्थिती होती. आनंद चिठ्ठी यांनी आकर्षक फोटो स्लाईड शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सापांची माहिती दिली. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील चुकीच्या समजुती, अंधश्रद्धा व भीती दूर होऊन निसर्गातील या जीवांविषयी आदरभाव निर्माण झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना चिठ्ठी यांनी उत्तरे देत शंकांचे निरसन केले. या कार्यक्रमास एस. आर. दळवी फाउंडेशन मुंबई यांचे सहकार्य लाभले. एनसीसी विभागाचे कॅडेटसनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केला.