satara news
शिष्यवृत्तीमध्ये राज्यात सर्वाधिक गुण मिळवूनही पहिल्या क्रमांकापासून वंचित  Pudhari photo
सातारा

शिष्यवृत्तीमध्ये राज्यात सर्वाधिक गुण मिळवूनही पहिल्या क्रमांकापासून वंचित

पुढारी वृत्तसेवा

कोरेगाव : पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत रहिमतपूर, ता. कोरेगाव येथील आदर्श विद्यालयाचा विद्यार्थी यशराज विजयकुमार जाधव याला राज्यात सर्वाधिक २९० गुण मिळाले आहेत. मात्र, तरीही त्याला राज्यातील पहिल्या क्रमांकापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. वयाच्या अटीचा निकष लावल्यामुळे त्याच्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला. त्यामध्ये राज्यात प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांस २८८ गुण मिळाले आहेत. तर यशराज यास २९० गुण मिळाले आहेत. मात्र, यशराज यास वयाच्या अटीत बसत नसल्याचा निकष लावल्यामुळे शासनाने त्याला प्रथम क्रमांक दिलेला नाही. वास्तविक शिष्यवृत्ती अर्ज भरतेवेळी हा विद्यार्थी वयाच्या अटीस पात्र होता. असे असताना आता निकाल जाहीर झाल्यानंतर वयाची अट लावल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

११ वर्षे वयाचा शासनाचा निकष आहे. या निकषामुळेच राज्यात सर्वाधिक गुण मिळवूनही यशराजला पहिल्या क्रमांकापासून वंचित राहावे लागले आहे. दरम्यान, आदर्श शिक्षण संस्थेचे आदर्श विद्यालय रहिमतपूरचे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात सात तर जिल्ह्यात पंधरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले असून विद्यालयाचा शिष्यवृत्तीचा निकाल ८०.३९ टक्के लागला आहे.

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती यादीत यशराज विजयकुमार जाधव २९० गुण, समर्थ लक्ष्मण कदम २८०, स्वरा राजेंद्र हुंबे २७८, स्वरा सदानंद भोसले २७८, आर्यन हणमंत कुंभार २७४, इंद्रनिल सूर्यकांत निकम २७४, शर्वरी किरण माने २७२, नेत्रा किरण भोसले २६८, कृष्णा धनाजी सूर्यवंशी २६२, सनाया अकबर आतार २६२, श्रावणी अमोल भिसे २५२, आराध्या राहुल माने २४६, ऋणाली कुणाल वाडेकर २४४, जीवन महादेव माने २४२, वहळ राहुल बुक्कम २४२, गंधार अमोल सणगर २४०. अन्वी दीपक माने २४० असे गुण मिळाले आहेत.

तर इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. त्यामध्ये सुयश चंद्रकांत साळुंखे २३०, सिध्देश राजेंद्र क्षीरसागर-२२८ यांचा समावेश आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष नंदकुमार माने पाटील, उपाध्यक्ष अशोकराव माने, सचिव वि.वा. साळवेकर, मुख्याध्यापक अनिल बोधे व पालकांनी अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिष्यवृत्ती फॉर्म भरतेवेळी विद्यार्थी वयाबाबतच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नियमानुसारच जाहीर झाला आहे.
धनंजय चोपडे गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, कोरेगाव
SCROLL FOR NEXT