Money Scam Pudhari
सातारा

Loan scam: एसटी प्रवासी महिलेला ‌‘कर्जाच्या‌’च्या आमिषाने गंडा

सातारा ते महाबळेश्वर या मार्गावर एसटी बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेची ‌‘कर्ज मिळवून देतो‌’ असे आमिष दाखवत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर : सातारा ते महाबळेश्वर या मार्गावर एसटी बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेची ‌‘कर्ज मिळवून देतो‌’ असे आमिष दाखवत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संशयिताने गुंगीचे औषध देत सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास करुन पलायन केले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुजाता सूर्यकांत देवरुखकर (वय 32, रा. नरवन, ता. महाड, जि. रायगड) या .28 एप्रिल रोजी दुपारी 3.30 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सातारा ते महाबळेश्वर असा एसटी बसने प्रवास करत होत्या. यावेळी संदीप नावाच्या सुमारे 45 वर्षीय संशयिताने त्यांच्याशी ओळख करुन घेत ‌‘लोन मिळवून देतो‌’ असे आमिष दाखवत विश्वास संपादन केला.

प्रवासादरम्यान संशयिताने पाण्यातून गुंगीकारक द्रव्य देऊन महिलेला बेशुद्ध केले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सुमारे 1 लाख 40 हजार रुपये किंमतीचे दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच 25 हजार रुपये किंमतीचा व्हीओ कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल असा एकूण 1 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. घडलेल्या प्रकाराची तक्रार संबंधित महिलेने महाबळेश्वर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरू असून पुढील तपास पोनि बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि एम. बी. परजणे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT