Soldiers Leave Cancelled | ये जाते हुए लम्होऽऽऽ जरा ठहरोऽऽ जरा ठहरोऽऽ File Photo
सातारा

Soldiers Leave Cancelled | ये जाते हुए लम्होऽऽऽ जरा ठहरोऽऽ जरा ठहरोऽऽ

जवानांच्या सुट्ट्या रद्द : कर्तव्यावर निघालेल्या सैनिकांचे कुटुंबीय भावूक

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पहलगाम हल्ल्याचा बदला एअर स्ट्राईक करून घेतल्यानंतर भारत व पाकिस्तान देशातील वातावरण तंग झाले आहे. या पार्श्वभूमीवर सुट्टीवर गावी आलेल्या जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून सैनिकांच्या कुटुंबियांची परिस्थिती ‘ए जाते हुए लम्हो..जरा ठहरो, जरा ठहरो’, अशी भावूक बनली आहे.

भारतीय सैन्य दलात सातारा जिल्ह्यात शेकडो जवान कर्तव्य बजावत आहेत. मिल्ट्री अपशिंगे सारख्या गावात तर घरटी जवान देशसेवा बजावत आहेत. काश्मिर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर दशतवाद्यांनी भ्याड हल्ला केल्यानंतर भारत देशात अस्वस्थता पसरली. अखेर 13 दिवसानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळ अड्ड्यांवर हवाई हल्ले करुन 100 दहशतवादी मारले. भारताने घेतलेल्या या बदल्याचा केवळ आपल्या देशानेच नव्हे तर संपूर्ण जगाने या कारवाईचे स्वागत केले.

एअर स्ट्राईक केल्यानंतर भारत व पाकिस्तान देशातील तणाव अधिक वाढला आहे. भारत देशाचे तिन्ही दल व देशांतर्गत पोलिस अलर्ट आहेत. एअर स्ट्राईकच्या या पाश्वर्र्भूमीवर भारताच्या तिन्ही दलातील जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबतचे मेसेज व फोन सुट्टीवर असलेल्या जवानांना कंट्रोल रुममधून जात आहेत. यामुळे गेली दोन दिवस सातारा जिल्ह्यातील जवानही त्या त्या ठिकाणी हजर होण्यासाठी निघाले आहेत.

जवान पत्नींना सर्वाधिक वियोग...

देशकर्तव्यावर असणारा आपला पती कधी घरी येईल याकडे जवान पत्नी अक्षरश: डोळे लावून बसतात. आताच्या परिस्थितीमध्ये सुट्टीवर असतानाही आपत्कालीन परिस्थितीमुळे अर्धवट सुट्टी भोगून जवानांना जावे लागत आहे. यामुळे जवान पत्नींना सर्वाधिक वियोगाला सामोरे जावे लागत आहे. एसटीला बसवताना, रेल्वेला बसवताना सर्वच कुटुंबीयांचे डोळे पानावत आहेत. ‘देशाला वाचवा.. स्वत:ही सुरक्षित राहा,’ अशी भावना जवानांप्रति समाजाची झाली आहे.

सोशल मीडियावर जवांनासाठी मोहीम...

दोन्ही देशाच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे सुट्टीवर आलेले जवान हजर होण्यासाठी निघाले आहेत. या जवानांना एसटी, रेल्वेमध्ये बसण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. जवानांचे साहित्य देण्यासाठी व ठेवण्यासाठी मदत करावी. आपले जवान आपली रक्षा करण्यासाठी निघाले आहेत. चला त्यांना सहकार्य करुया, जवानांसाठी अशी चळवळ सुरु झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT