Moneylending Pudhari News Network
सातारा

Satara Moneylending Case: सावकारीतून दोघांना डांबून ठेवले; तिघांना अटक

वीस टक्‍के व्‍याजाने पैसे दिल्‍यानंतर त्‍याची परतफेड केल्‍यानंतरही आणखी पैशांचा तगादा लावून सातार्‍यात दोघांना ५ दिवस डांबून ठेवल्‍याची धक्‍कादायक माहिती समोर आली

पुढारी वृत्तसेवा

सातारा : वीस टक्‍के व्‍याजाने पैसे दिल्‍यानंतर त्‍याची परतफेड केल्‍यानंतरही आणखी पैशांचा तगादा लावून सातार्‍यात दोघांना ५ दिवस डांबून ठेवल्‍याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. दरम्‍यान, सावकारीच्या या थरारक घटनेने सातारा हादरला आहे.

आकाश ऊर्फ तात्‍या साबळे (रा. शिवथर, ता. सातारा), नाना चौगुले (रा. खेड), प्रतीक पोतदार (रा. शिवथर), अक्षय साबळे (रा. शिवथर) या चौघांविरद्ध गुन्‍हा दाखल झाला आहे. यातील आकाश साबळे पसार झाला आहे. याप्रकरणी प्रवीण विठ्ठल इंगवले (वय ५६, रा. किडगाव, ता. सातारा) यांनी सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ही घटना दि. ६ ते ११ जून या कालावधीत घडली आहे. प्रवीण इंगवले यांना पैशांची गरज असल्‍याने ते नाना चौगुले व आकाश साबळे यांना भेटले. त्‍यांनी माऊली फायनान्‍सच्या माध्यमातून २० टक्‍के व्‍याजाने पैसे देतो, असे सांगितले. पैसे दिल्‍यानंतर संशयितांनी त्‍या बदल्‍यात पत्‍नीच्या नावे असलेल्‍या दुचाकीची कागदपत्रे, कोरे चेक घेतले. तक्रारदार यांना हॉस्‍पिटलसाठी पैसे लागणार असल्‍याने पुन्‍हा ३ लाख रुपये व्‍याजाने देण्यासाठी गेले; मात्र संशयितांनी ३ लाख रुपये न देता तक्रारदार यांचा भाऊ, चुलत भाऊ व मित्र यांनी व्‍याजाने घेतलेले पैसे परत न दिल्‍याने त्‍यांचे पैसे तुम्‍हीच द्यायचे, असे म्‍हणत दमदाटी करत संशयितांनी तक्रारदार व त्‍यांचा मित्र संदीप कांबळे यांना डांबून ठेवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT