सातारा

Dr. Smita Jadhav | पदवीधरांसाठी डॉ. स्मिता जाधव सक्षम उमेदवार : आ. डॉ. अतुल भोसले

जिल्ह्यात पदवीधर मतदारांची सुमारे ४७ हजार नोंदणी झाली असून, ९० टक्के मतदान घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्यात महायुतीची स्थिती भक्कम आहे. जिल्ह्यात पदवीधर मतदारांची सुमारे ४७ हजार नोंदणी झाली असून, ९० टक्के मतदान घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी डॉ. स्मिता जाधव सक्षमपणे काम करतील, असा विश्वास आ. डॉ. अतुल भोसले यांनी शिक्षक व पदवीधरांच्‍या मेळाव्‍यात व्यक्त केला.

शेंद्रे येथील मेळाव्‍यात बोलताना आ. डॉ. अतुल भोसले म्‍हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते मतांच्या माध्यमातून मोठी भेट देतील. बुथ पातळीवर भाजपतर्फे मायक्रोप्‍लॅनिंग केले आहे. महायुतीच्‍या तिन्‍ही पक्षांतील नेतेमंडळी ताकदीने काम करत आहेत.

जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे म्हणाल्या, भाजपने पदवीधर मतदारसंघासाठी सक्षम महिला उमेदवार दिल्‍या आहेत. डॉ. स्मिता जाधव यांचे महिलांचे संघटन मजबूत असून, ‘पुढारी कस्तुरी क्लब’च्या माध्यमातून त्यांनी दूरदृष्टीने काम केले आहे. सातारा जिल्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, शेंद्रे येथील मेळावा त्यांच्या विजयाची नांदी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ म्‍हणाले, ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी स्‍पर्धा परीक्षा देणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांचा प्रश्‍न मार्गी लावला आहे. अनेक शिक्षक हे आमदार झाले. पण शिक्षकांचे व शाळांचे प्रश्‍न सुटले नाहीत. चंद्रकांत पाटील यांच्‍या रुपाने चांगला आमदार मिळाल्‍यानंतर अनेक प्रश्‍न मार्गी लागले. डॉ. स्‍मिता जाधव आणि कौस्‍तुभ गावडे या दोघांवर दोन्‍ही महाराजांचा आशीर्वाद असल्‍याने ते नक्‍की शाळांचे व शिक्षक, पदवीधरांचे प्रश्‍न सोडवतील.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजूभैया भोसले यांनी प्रास्ताविक केले. मतदान प्रक्रिया कशी असेल आणि मतदान कसे करावे, याची माहिती अविनाश कदम यांनी दिली. यावेळी तुषार पाटील, मोहनराव जाधव, संभाजी शेळके, भानुदास मोहिते, तात्‍यासाहेब वाघमारे, दीपक उत्तेकर, संजय नलवडे, चंद्रकांत जाधव, विश्‍वास कदम, युसुफभाई पटेल, नंदाभाऊ जाधव, प्रशांत नारकर, प्रा. अजिंक्‍य सगरे, संतोष मोरे, धनाजी जाधव, लक्ष्‍मण उबाळे, पदमजी फडतरे, प्रदीप ढाणे, आर. वाय. जाधव, भरत जगताप, अनिल जायकर, सदाशिव कणसे, बंडू ढाणे, संजय यादव, भरत मोझर, सचिन नलवडे, यशवंत गायकवाड, दीपक भुजबळ आदी संस्‍थाचालक, शिक्षक उपस्‍थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT