Shivendraraje Bhosale 
सातारा

Shivendraraje Bhosale : मने कलुषित होतील, असे वागू नका

शिवेंद्रराजेंनी भाजप नगरसेवकांना सुनावले

पुढारी वृत्तसेवा

सातारा : आपापल्या प्रभागात कामे होत नसतील, प्रशासनाकडून सहकार्य होत नसेल तर सभागृहात संबंधित नगरसेवक चर्चा करू शकतात. सातारकरांनी भाजपचेे नगरसेवक म्हणून निवडून दिले आहे. पदाधिकारी व अनुभवी नगरसेवकांनी नवख्या नगरसेवकांना मदत करावी. एकमेकांबद्दल मने कलुषित होतील, असे वागू नका, अशा शब्दांत ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी नगरसेवकांना सुनावले.

सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ना. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांची बैठक झाली. यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर, मुख्याधिकारी विनोद जळक, गटनेते अविनाश कदम, पक्षप्रतोद निशांत पाटील, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, बांधकाम सभापती बाळू खंदारे, नियोजन सभापती अशोक शेडगे, महिला व बालकल्याण सभापती मोनिका घोरपडे उपस्थित होते.

भोसले म्हणाले, सातारा पालिका बैठकीत विकासकामे, त्यासाठी आवश्यक निधी, वाहतूक व अतिक्रमण उपाययोजना यावर चर्चा झाली. पूर्वी दोन आघाड्या होत्या. काही काळ आघाड्या एकत्र होत्या. नंतर स्वतंत्र निवडणूक लढल्यावर संघर्षही झाला. सातारकरांनी भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून दिल्याने कुणाच्याही आघाड्या नाहीत. मी किंवा उदयनराजे भाजप पक्ष म्हणून काम करतो. हीच भूमिका नगरसेवकांनाही ठेवावी लागेल. प्रत्येकाची कामे कशी मार्गी लागतील, यादृष्टीने प्रयत्न करावेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT