Shivendraraje bhosale Pudhari Photo
सातारा

Shivendraraje Bhosale : दहा कोटी दिल्याचे आ. शिंदेनी पुरावे द्यावेत

शिवेंद्रराजे भोसले : अपयश लपवण्याचा हा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्याला 10 कोटी रुपये दिल्याचे पुरावे द्यावे. मोघम आरोप करू नये, स्वत:चे अपयश लपवण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचा पलटवार ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्यावर केला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी केलेल्या आरोपाबाबत बोलताना ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, आ. शशिकांत शिंदे यांच्याकडे एवढी माहिती असेल, तर त्यांनी पुराव्यासकट बोलावे. त्यांना अपयश आले, त्यांचे सदस्य त्यांचे राहिले नाहीत. त्यांच्या सदस्यांचा त्यांच्यावर विश्वास नाही. सदस्य आमच्याबरोबर आले आम्हाला सहकार्य केले म्हणून स्वत:चे अपयश काही तरी करून लपवायचे हा त्यातला प्रकार आहे. एवढं ठामपणे आ. शिंदे बोलतात 10 कोटी दिले, तर त्यांनी पुराव्यासकट बोलावे मोघम आणि अधांतरी आरोप करण्यात काहीही अर्थ नाही, असेही ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT