Shivendraraje bhosale Pudhari Photo
सातारा

Shivendraraje bhosale: पद्म पुरस्कार समितीत ना. शिवेंद्रराजे

राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली

पुढारी वृत्तसेवा

सातारा : विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्याकरता शासनाकडून राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र शासनाने यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे. या समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ना. हसन मुश्रीफ, ना. दादाजी भुसे, ना. डॉ. उदय सामंत, ना. पंकजा मुंडे आणि ना. आदिती तटकरे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. ही समिती विविध माध्यमांतून प्राप्त प्रस्तावांची छाननी करून केंद्र शासनाकडे पाठवण्यासाठी योग्य मान्यवरांच्या नावांची शिफारस राज्य शासनास करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT