Shikhar Shinganapur crime Pudhari
सातारा

Shikhar Shinganapur crime: शिंगणापुरात आढळली मानवी कवटी

घातपाताचा संशय : अहवाल आल्यानंतरच होणार उलगडा

पुढारी वृत्तसेवा

शिखर शिंगणापूर : शिंगणापूर येथील बळीपवस्ती परिसरातील डोंगरभागात सोमवारी मानवी कवटी बेवारस स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित कवटी पुढील तपासासाठी बी. जे. रुग्णालय, पुणे येथे पाठवली आहे. या घटनेबाबत स्थानिक नागरिकांतून उलटसुलट चर्चा सुरू असून, पोलिस याचा कसून शोध घेत आहेत.

याबाबत दहिवडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिंगणापूर येथील बळीपवस्ती जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील बाजूस असलेल्या डोंगरभागात सोमवारी सायंकाळी काही नागरिकांना एक मानवी कवटी बेवारस स्थितीत आढळून आली.

सदरची कवटी अंदाजे 35 वर्षे वयाची आहे. याची माहिती पोलिसपाटील संतोष बोराटे यांनी पोलिसांना दिली. यानंतर दहिवडीचे पोलिस उपअधीक्षक रणजित सावंत, सपोनि दत्तात्रय दराडे, पोलिस उपनिरीक्षक चांदणी मोटे, मोहन हांगे यांच्या पथकाने बळीपवस्ती परिसरात घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. तपासणीचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही कवटी पुरुष जातीची आहे की, स्त्री जातीची आहे, मृत व्यक्तीचे वय किती असेल, बेवारस व्यक्तीचा मृत्यू किती दिवसांपूर्वी झाला असेल, मृत्यूचे कारण काय असू शकेल यासारख्या बाबींचा उलगडा होऊ शकतो, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT