Shashikant Shinde 
सातारा

Shashikant Shinde | दादागिरी करणार नाही, पण चुकीला विरोध करणार : शशिकांत शिंदे

हुमगाव-आखाडे येथील हाणामारीच्या घटनेनंतर दोन्ही गटांकडून परस्पर आरोप करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : हुमगाव-आखाडे आणि इंदवली परिसरातील गावांमध्ये दादागिरी करण्याचा अथवा संघर्षाला खतपाणी घालण्याचा आपला कोणताही प्रयत्न राहणार नाही. आपण कोणत्याही प्रकारच्या दादागिरीच्या वादाला प्रवृत्त होणार नाही, मात्र, चुकीला विरोध करणारच, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जावलीचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हुमगाव-आखाडे येथील हाणामारीच्या घटनेनंतर दोन्ही गटांकडून परस्पर आरोप करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या प्रकरणात पोलिसांना सर्व पुरावे देण्यात आले आहेत. मात्र, पोलिसांनी एका बाजूनेच गुन्हा दाखल केल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला. दुसऱ्या प्रकरणात सोन्याची चेन हिसकावणे, दरोड्यासारखे गंभीर स्वरूपाचे आरोप अथवा कलमे लावण्याचा प्रयत्न झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या संपूर्ण कारवाईला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. संबंधित व्यक्तींवरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एखाद्या व्यक्तीच्या घरात जाऊन त्याला उगाच त्रास देणे अथवा वाद निर्माण करणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राजकीय मतभेद असले तरी ते व्यक्तिगत पातळीवरील संघर्षात रूपांतरित होऊ नयेत, असा संदेशही त्यांच्या वक्तव्यातून देण्यात आला.

१९९९ पासूनच्या राजकीय प्रवासात आपल्यावर दादागिरीचे आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवरही शशिकांत शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. चुकीचे वर्तन करणाऱ्या व्यक्तींना योग्य मार्गावर आणले पाहिजे; मात्र त्यासाठी दहशत किंवा दादागिरीचा मार्ग स्वीकारणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT