Shashikant Shinde 
सातारा

Satara District Bank Election | जिल्हा बँकेत पक्षाचे अस्तित्व दाखवणार : शशिकांत शिंदे

आम्‍हाला कोणीही विचारात घेत नव्‍हते यासाठी दोन ठिकाणांवरून उमेदवारी अर्ज दाखल केला

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेत भाजपची महत्त्‍वाकांक्षा वाढली आहे. आम्‍हाला कोणीही विचारात घेत नव्‍हते. यासाठी मी दोन ठिकाणांवरून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्‍ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जिल्‍हा बँकेत आपले अस्‍तित्‍व दाखवणार आहे, असा विश्‍वास पक्षाचे प्रदेशाध्‍यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्‍यक्‍त केला.

शिंदे म्‍हणाले, जिल्‍हा बँकेत राजकारण येऊ नये, ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. पक्षीय राजकारणाला बँकेत वाव दिला जाऊ नये. बँकेतील सत्तासंघर्ष वाढला की बँक चालवण्याचा मूळ उद्देश बाजूला पडतो. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मी दोन मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आम्हाला चर्चेत सहभागी करून घेतले जात नसल्याची परिस्थिती होती.

मात्र, या दोन जागांच्या माध्यमातून तरी आमची भूमिका विचारात घेतली जाईल, अशी अपेक्षा आहे. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अस्तित्व आहे, हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. आगामी काळात राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात मोठे बदल होतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्धारही व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT