Shambhuraj Desai (File Photo)
सातारा

Shambhuraj Desai | कोरेगावचे आमदार शिवसैनिकांच्या मतदानावरच निवडून आले : ना. शंभूराज देसाई

पक्ष कार्यक्रमास त्यांना यावेच लागेल

पुढारी वृत्तसेवा

सातारा : कोरेगावच्या आमदारांची नाराजी दूर झाली का? मी स्वबळावर निवडून आलो असे ते सांगत आहेत, याकडे लक्ष वेधले असता ना. शंभूराज देसाई म्हणाले, ते कधी नाराज होते? पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांना यावे लागेल. ते धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यांना निवडून येण्यासाठी शिवसैनिकांनी मतदान केले आहे. शिवसेनेच्या मतदानावरच ते कोरेगावचे आमदार झाले आहेत, अशी भूमिका पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृति आराखडा समारोप कार्यक्रम व खरीप हंगाम आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे उपस्थित होते.

ना. शंभूराज देसाई म्हणाले, जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्यात आला. 500 हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतावर जावून पाणीव्यवस्थाबाबत सरकारचे असलेल्या धोरणाची माहिती शेतकऱ्यांना दिली. कमी पाण्यात जादा उत्पन्न कसे काढावे, यांचे तंत्र शेतकऱ्यांना अवगत व्हावे यासाठी जलसंपदा विभागाने प्रयत्न करावेत. पुढील दीड महिने पावसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात पुरेसा खतांचा साठा उपलब्ध आहे.

खत टंचाईची शक्यता भासल्यास तातडीने कृषी विभागाने अवगत केल्यास शासनाकडे पाठपुरावा करून खते उपलब्ध केली जातील. खतांची विक्री करताना लिंकिंग पद्धतीने इतर खते माथी मारण्याचा प्रकार दुकानदारांकडून सुरू असतो. याशिवाय बोगस खते, बियाणे, खतांचे लिंकिंग प्रकरणी कृषी विभागाच्या भरारी पथकाने 400 हून अधिक कारवाया केल्या आहेत. पाण्याचे नियोजन, खरीप परिस्थिती, खते व बियाणे साठा उपलब्ध आहे.

सर्व आमदारांशी चर्चा करून उर्वरित तालुक्यांमध्ये कृषी विभागाच्या बैठका घेतल्या जाणार आहे. जिल्ह्यात 1 मे ते 15 मे या टप्प्यातील स्वगणना करण्याच्या टप्प्याची सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात नागरिक स्वत: ऑनलाईन कुटुंबाची माहिती भरू शकतात. या माहितीची पडताळणी दुसऱ्या टप्प्यात प्रगणकांमार्फत घरोघरी जाऊन तपासली जाणार आहे. आवश्यकता भासल्यास नागरिकांना या टप्प्यात माहिती अपडेट करता येऊ शकते. हे राष्ट्रहिताचे काम असल्याने जनगणनेची माहिती भरण्यासाठी येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. जनणनेची संपूर्ण तयारी प्रशासनाने तयारी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT