शाहूपुरी पोलिसांकडूनही डीजेंवर गुन्‍हे Pudhari File Photo
सातारा

Satara News : शाहूपुरी पोलिसांकडूनही डीजेंवर गुन्‍हे

चार तक्रारी : झाडाझडतीमुळे चालक, मालक गॅसवर

पुढारी वृत्तसेवा

सातारा : शनिवारी सातार्‍यात मिरवणुकीवेळी डीजे चालकांनी मोठ्या आवाजात गाणी लावून तसेच पोलिसांनी सांगूनही डीजेची वाहने पुढे नेली नाहीत, यावरुन ४ गुन्‍हे दाखल केले. शहर पोलिसांनंतर शाहूपुरी पोलिसही ॲक्‍शन मोडवर गेले आणि त्‍यांनी झाडाझडती घेण्यास सुरुवात केल्‍याने डीजे मालक, चालक गॅसवर गेले आहेत. दरम्‍यान, सातार्‍यात दोन दिवसात ७ डीजे चालकांवर गुन्‍हे दाखल झाले आहेत.

पोलिस शुभम चव्‍हाण यांनी डीजे चालक अभिषेक रविंद्र चव्‍हाण (रा.म्‍हसवे ता.जावली) याच्या विरुध्द तक्रार दिली आहे. मतकर कॉलनी, सातारा येथे ही कारवाई केली आहे. दुसरी तक्रार पोलिस शुभम चव्‍हाण यांनी डीजे चालक सुरज दिनकर पवार (रा. रविवार पेठ, सातारा) याच्या विरुध्द दिली आहे. सातार्‍यातील बुधवार पेठ येथे मिरवणुकीवेळी पोलिसांनी ही कारवाई केली. तिसरी तक्रार पोलिस दिपक पोळ यांनी डीजे चालक अरिफ सलीम मुलाणी (वय ३०, रा. कार्वे ता.कराड) याच्या विरुध्द दिली आहे. पोलिसांनी ही कारवाई शनिवार चौक ते देवी चौक या दरम्‍यान केली आहे. चौथी तक्रार पोलिस दिपक पोळ यांनी डीजे चालक रोहित तानाजी बाचल (रा.सैदापूर ता.सातारा) व रोहन उमेश गोरे (वय २२, रा. सैदापूर ता.सातारा) या दोघांविरुध्द दिली आहे. गोलबाग सर्कल ते देवी चौक यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली. शनिवारी सातार्‍यातील मिरवणूक प्रकरणी शहर पोलिसांनी तीन डीजे चालकांवर गुन्‍हे दाखल केले आहेत. त्‍या पाठोपाठ शाहूपुरी पोलिसांनीही कारवाईचा बडगा उगारला. शनिवारी झालेल्‍या मिरवणुकीवेळी आरपीआयसह विविध संघटनेने मोती चौकात ठिय्या आंदोलन केल्‍यानंतर तणाव निर्माण झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT