सातारा

Satara soldier martyred: ‘एलओसी’वर शहापूरचा जवान शहीद

जम्मू-काश्‍मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेनजीक गस्‍त घालत असताना भूसुरुंगाचा स्‍फोट होऊन शहापूर (जि. सातारा) येथील जवान अर्जुन रामचंद्र जाधव हे शहीद झाले

पुढारी वृत्तसेवा

मसूर : जम्मू-काश्‍मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेनजीक गस्‍त घालत असताना भूसुरुंगाचा स्‍फोट होऊन शहापूर (ता. कराड, जि. सातारा) येथील जवान अर्जुन रामचंद्र जाधव (वय ३०) हे शहीद झाले आहेत. ही दुर्दैवी घटना मंगळवारी घडली आहे.

अर्जुन जाधव हे सन २०१६-१७ मध्‍ये भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. २०२४ मध्‍ये त्यांचा विवाह झाला होता. अर्जुन जाधव यांनी यापूर्वी पुणे येथे देशसेवा बजावली होती आणि मागील काही वर्षांपासून ते जम्मू - काश्‍मीरमध्ये देशसेवा बजावत होते. मंगळवारी संध्याकाळी आपल्या सहकाऱ्यांसह ते बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये भारतीय नियंत्रण रेषेनजीक गस्‍त घालत होते. यावेळी अचानकपणे भूसुंरुगचा स्‍फोट झाला आणि त्यात अर्जुन जाधव हे सहकाऱ्यासोबत गंभीर जखमी झाले होते.

घटनेनंतर तातडीने त्यांना हेलिकॉप्‍टरमधून श्रीनगरमधील बदामीबाग छावणीतील लष्करी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय सूत्रांनी त्यांना मृत घोषित केल्याची माहिती ग्रामस्‍थांना समजली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT