काले : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेचे माजी सभापती भीमरावदादा पाटील (वय 92) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकारणावर त्यांनी 60 वर्ष दबदबा ठेवला.
भीमरावदादा पाटील यांनी 1962 ते 1967 या काळात काले गावचे सरपंच म्हणून काम केले. तर 1967 ते 1972 या काळात कराड पंचायत समिती उपसभापती म्हणून काम केले. 1972 ते 1977 मध्ये ते कराड पंचायत समिती सभापती होते. 1977 ते 1979 आणि 2005 ते 2008 असे दोनवेळा ते जिल्हा परिषदेचे कृषी सभापती होते. अनेक वर्ष कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम केलं. त्यांनी 1980 ला विधानसभा निवडणुकही लढवली होती. त्याना राज्य शासनाच्या दलित मित्र पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
अतिशय परखड आणि स्पष्टवक्ते म्हणून तालुक्याच्या राजकारणात त्यांची ओळख होती. काले जिल्हा परिषद मतदार संघावर त्यांनी एकहाती वर्चस्व ठेवले.