School Pudhari
सातारा

Schools Reopening : दिवाळीसुट्टीनंतर ज्ञानमंदिरे पुन्हा गजबजणार

वर्गखोल्या, परिसर स्वच्छतेची धांदल : विद्यार्थ्यांनाही भेटीची ओढ

पुढारी वृत्तसेवा

सातारा : दिवाळीची सुट्टी संपल्याने जिल्ह्यातील सर्व शाळा गुरुवार दि. १९ नोव्हेंबरपासून सुरु होत आहेत. मागील पंधरा दिवसांपासून बंद असलेली ज्ञानमंदिरे सोमवारी पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजणार आहेत. विद्यार्थ्यांनाही वर्गमित्र-मैत्रिणींसह ज्ञानमाऊलीच्या भेटीची ओढ लागली आहे. या पार्श्वभूमीवर वर्गखोल्यांसह परिसर स्वच्छतेची शाळा व्यवस्थापनांची धांदल उडाली होती.

जिल्ह्यातील सर्व बहुतांश शाळांना दि. ५ नोव्हेंबर तर काही शाळांना २ नोव्हेंबरपासून दिवाळी सुट्ट्या लागल्या होत्या. काही खाजगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा वगळता प्राथमिक व माध्यमिक शाळा आजपासून सुरु होत आहेत. गत पंधरा दिवस ही ज्ञानमंदिरे बंद होती. गेल्या काही दिवसांपासून शुकशुकाट असलेल्या या शाळा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने पुन्हा गजबजणार आहेत.

शाळा पूर्व तयारीसाठी शाळा सुरु होण्याच्या एक ते दोन दिवस आधीपासून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी शाळेत हजर झाले आहेत. बुधवारी काही दिवस बंद असलेल्या वर्गखोल्यांची साफसफाई, स्वच्छतागृह, पाण्याची टाकी, आदिंची स्वच्छतेच्या कामांची लगबग बहुतांश शाळांमध्ये सुरु होती. त्यामुळे शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची वर्दळ दिवसभर सुरु होती. चिमुकल्यांमध्येही दिवाळी सुट्टीमुळे दुरावलेल्या मित्र-मैत्रिणींना भेटून सुट्टीतील गंमती-जंमती सांगण्याची आतुरता वाढली आहे. दरम्यान, सुट्टी संपवून परगावाहून परतलेल्या पालकांची शाळापूर्व तयारीसाठी धांदल उडाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT