खटाव : खटाव (ता. पुसेगाव) येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरने फोडून 26 लाख 30 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना रविवारी पहाटे 4.20 ते 5.15 च्या दरम्यान घडली.
पुसेगाव येथील दहिवडी रोडलगत सेवागिरी कॉम्प्लेक्सच्या इमारतीत स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम सुविधा ते मशिन रविवारी पहाटे चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने लोखंडी सेफ डोअर कट करून व फोडून ट्रे मधील 26 लाख 30 रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले. रविवारी पहाटेच्या सुमारास एटीएम फोडल्याची घटना उघडकीस येताच एटीएम व्यवस्थापकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमण यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिस एटीएम फोडणाऱ्या टोळीचा शोध घेत आहेत. यासाठी डॉग स्कॉडपासून सर्व यंत्रणा कामाला लावली आहे.