पिंपोडे बुद्रुक : वीज कनेक्शन देण्यासाठी खांबावर चढलेल्या कंत्राटी वायरमनचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना खामकरवाडी ता. कोरेगाव येथे शुक्रवारी घडली. राहुल अशोक यादव (वय 42, रा.पिंपोडे खुर्द ता. कोरेगाव) असे मृत वायरमनचे नाव आहे.
पिंपोडे खुर्द येथील राहुल यादव हा 2007 पासून देऊर येथील महावितरणच्या शाखा कार्यालयात कंत्राटी वायरमन म्हणून कार्यरत होता. त्याच्या कार्यक्षेत्रात पिंपोडे खुर्द व खामकरवाडी अशी गावे होती. शुक्रवारी सकाळी 11 च्या दरम्यान राहुल हा खामकरवाडी येथील एका घरातील वीज कनेक्शन देण्यासाठी खांबावर चढला होता. त्यावेळी विजेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद वाठार पोलिस ठाण्यात झाली आहे.