खटाव : तब्बल 9 वर्षांनी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी खटाव तालुक्यातून एकूण 175 अर्ज दाखल झाले आहेत. सुगीचे दिवस आलेल्या भाजप आणि एकत्र आलेल्या दोन्ही राष्ट्रवादीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या चांगलीच वाढल्याने बंडखोरांचा तोरा वाढणार आहे. कोरेगाव मतदारसंघात समाविष्ट खटाव आणि बुध गटात शिवसेनेच्या आ. महेश शिंदेंनी त्यांचे उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर उभे करुन विरोधकांना चेकमेट देणारी चाल खेळली आहे.
खटाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात गटांच्या निवडणुकीसाठी 309 मतदानकेंद्रे आहेत. तालुक्यातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकूण 420 अर्जांचे वितरण करण्यात आले होते. तालुक्यातून 7 गटांसाठी पुरुष 27 उमेदवार आणि महिला 24 उमेदवार अशा 51 उमेदवारांनी एकूण 63 अर्ज दाखल केले आहेत. पंचायत समितीच्या 14 गणांसाठी एकूण 412 अर्ज इच्छुकंनी घेतले होते. विविध राजकीय पक्षांच्या तसेच अपक्ष 91 उमेदवारांनी 112 अर्ज दाखल केले आहेत.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आरक्षित बुध गटातून भाजपकडून पुनम मंदार माळी, प्रिती विकास त्रिपुटे, रुपाली दयानंद पुरे यांनी तर राष्ट्रवादीकडून लता अविनाश कर्णे आणि समृद्धी अविनाश कर्णे यांनी अर्ज दाखल केले आहेत. मोनिका सागर मदने आणि पुनम मंदार माळी यांचे अपक्ष अर्ज दाखल झाले आहेत. हाय व्होल्टेज खटाव गटातून राष्ट्रवादीकडून राहुल रमेश पाटील, प्रिती प्रभाकर घार्गे यांनी तर डॉ. प्रिया महेश शिंदे यांनी भाजप आणि अपक्ष अर्ज दाखल केला आहे. जयवंतराव लक्ष्मणराव शिंदे, सचिन सुभाष महाजन, प्रशांत साहेबराव खुस्पे यांनी अपक्ष तर गणेश पोपट यादव यांनी वंचित बहुहजन आघाडीकडून अर्ज दाखल केले.
कातरखटाव गटातून राजाराम आण्णा खाडे ( काँग्रेस), भाजपकडून तानाजी सर्जेराव बागल, धनंजय गोरख चव्हाण, मेघा धनंजय चव्हाण यांनी तर राष्ट्रवादीकडून अभयसिंह खाशेराव जगताप, अजयकुमार बाबासाहेब सानप यांनी अर्ज दाखल केले. तानाजी बागल आणि धनंजय चव्हाण यांनी अपक्षही अर्ज दाखल केले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अनिल रघुनाथ पवार, वंचित बहुजन आघाडीकडून अर्जुनराव उत्तम भालेराव, बहुजन समाज पार्टीकडून गणेश अशोक थोरात तर रामहरी बनसोडे, पांडुरंग शिंदे, अनिल पवार यांनी अपक्ष अर्ज दाखल केले. वजनदार निमसोड गटातून नानासो महादेव मोरे (भाजप), श्रीकांत बाळासो देवकर, सुमित उद्धव सुतार, शशिकांत मोरे, वैभव माने, महेश माने, प्रियांका महेश माने यांनी अपक्ष अर्ज दाखल केले. शशिकांत विठ्ठलराव मोरे यांनी भाजपकडून तर संदीप नारायण माडवे, दत्तात्रेय प्रल्हाद पवार, वैभव श्रीरंग माने यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केले.
औंध गटातून भारती अंकुश गोरे (भाजप), मनिषा योगेश फडतरे (राष्ट्रवादी), शैला विकास राऊत (राष्ट्रवादी), प्रियांका प्रवीण फडतरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. पुसेसावळी गटातून उषाताई निवृत्ती शिंदे (आप), सरिता उदय गुरव (अपक्ष), शैला सुनील कदम यांनी वंचित बहुजन आघाडीकडून, काजल सुभाष कदम यांनी शिवसेना, तेजस्विनी विक्रमशील कदम यांनी भाजपकडून, सुप्रिया किरण कदम यांनी शिवसेना उबाठा, रेखा संतोष घार्गे आणि रिया सुभाष पिसाळ यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज भरले. काजल सुभाष कदम, सुरेखा चंद्रकांत सावंत, अश्विनी श्रीकांत पिसाळ अपक्ष नशीब अजमावत आहेत.
मायणी गटातून सुरेंद्र मोहनराव गुदगे ( राष्ट्रवादी), पांडुरंग मनोहर झगडे (भाजप, अपक्ष), सुरज शिवाजीराव पाटील (भाजप), प्रल्हाद दादासो सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( श.पा. ) आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले. पंचायत समितीच्या डिस्कळ गणातून मुमताज हुसेन मुलाणी (अपक्ष), रेश्मा शिवाजी शेडगे (भाजप), रेश्मा शिवाजी शेडगे (शिवसेना), किशोरी महेश पवार (राष्ट्रवादी), पुजा विजय वाघ (वंचित बहुजन आघाडी ), बुध गणातून शामली सागर साळुंखे (राष्ट्रवादी आणि अपक्ष), स्मिता बाळकृष्ण सावंत (भाजप), रोहिणी कृष्णात सावंत (अपक्ष), पुसेगाव गणातून स्नेहल गौरव जाधव (राष्ट्रवादी), मिनाक्षी नवनाथ वलेकर (भाजप), अश्विनी हेमंत गोरे (राष्ट्रवादी, अपक्ष), कोमल आनंदराव काळुखे (राष्ट्रवादी, अपक्ष) यांनी अर्ज दाखल केले. खटाव गणातून जयवंतराव लक्ष्मणराव शिंदे (अपक्ष), बबन शंकर घाडगे (राष्ट्रवादी), मुगुटराव पतंगराव कदम (राष्ट्रवादी), आमीन मुबारक आगा (शिवसेना उबाठा, अपक्ष), गणेश जयसिंगराव देशमुख (भाजप), शशिकांत महादेव रोमण (भाजप) यांनी अर्ज दाखल केले.
दरुज गणातून विजय मोहन काळे ( भाजप, अपक्ष ), विक्रम हरिहर रोमण (भाजप, अपक्ष), प्रसाद शहाजी निंबाळकर (भाजप), निलेश सुरेश कोळेकर (अपक्ष), हणमंत सखाराम बोटे (भाजप, अपक्ष), राहुल विष्णू निकम (राष्ट्रवादी), अंकुश जयसिंग पवार (अपक्ष), तुषार सोपान खाडे (अपक्ष), शिवाजी भाऊसो बनसोडे (रासप), रामचंद्र शामराव निकम (भाजप), प्रमोद तुकाराम लावंड (राष्ट्रवादी), विजयकुमार हरिदास शिंदे (काँग्रेस, अपक्ष), रोहित चंद्रकांत लावंड (अपक्ष) यांनी अर्ज दाखल केले.
सभापतीपदासाठी आरक्षित कातरखटाव गणातून वनिता सोपान दुबळे (भाजप), सुवर्णा शैलेंद्र वाघमारे (अपक्ष), सुप्रिया नितीन जगताप (भाजप), कोमल संतोष कमाने (राष्ट्रवादी, अपक्ष), स्नेहा अमरजीत कांबळे (काँग्रेस), वनिता सोपान दुबळे (भाजप), आरती अर्जुन दुबळे (राष्ट्रवादी), छाया भगवान मोरे (वंचित), वंदना दत्तात्रेय शिंदे (वंचित), मीना सुरेश दुबळे (भाजप), रुपाली सचिन दुबळे (अपक्ष), वनिता संदीप भंडारे (अपक्ष) यांनी अर्ज दाखल केले आहेत.
निमसोड गणातून तेजश्री विजय शितोळे (काँग्रेस), सिमा हणमंत इंगळे (भाजप, अपक्ष), पूजा नानासो घाडगे (रासप), संगिता संजय शितोळे (भाजप), धनश्री मोहन देशमुख (काँग्रेस), वैशाली शशिकांत मोरे (भाजप ,अपक्ष), गुरसाळे गणातून सागर भगवान माने (भाजप), साहेबराव मोतीराम पाटोळे (भाजप), प्रसाद रामचंद्र वाघ (भाजप), किरण सोपान जाधव (भाजप), भरत शंकर जाधव (भाजप), बळीराम महादेव वाघ (अपक्ष), प्रियांका महेश माने (राष्ट्रवादी, अपक्ष), महेश बाळासो वाघ (राष्ट्रवादी), वैभव श्रीरंग माने (राष्ट्रवादी, अपक्ष), महेश भिकुराव माने (राष्ट्रवादी, अपक्ष), सिध्देश्वर कुरोली गणातून मनोज अमृतराव देशमुख (राष्ट्रवादी), प्रतापराव सोपानराव देशमुख (राष्ट्रवादी), दत्तात्रेय बळवंत गुरव (भाजप), किसन भाऊसो जाधव (भाजप), औंध गणातून शुभम राजाराम शिंदे (राष्ट्रवादी), दादासाहेब माधवराव इंगळे (भाजप), अमर मारुती देशमुख (राष्ट्रवादी), गणेश भगवान चव्हाण (भाजप,अपक्ष)
तर पुसेसावळी गणातून अनिल दिनकर माने (राष्ट्रवादी), अरविंद दत्तात्रेय शिंदे (अपक्ष), अमोल पांडुरंग कदम (भाजप), सतिश विष्णू शिंदे (अपक्ष), किरण बळवंत कदम (अपक्ष), अनिल दिनकर माने (शिवसेना, शिंदे गट ), संग्राम चंद्रकांत कदम (राष्ट्रवादी), सूर्यकांत शंकर कदम (राष्ट्रवादी), सौरभ प्रल्हाद चव्हाण (रयत क्रांती), म्हासुर्णे गणातून प्रगती चंद्रकांत कोकाटे (भाजप), अश्विनी श्रीकांत पिसाळ (अपक्ष), रेखा संतोष घार्गे (राष्ट्रवादी), रिया सुभाष पिसाळ (राष्ट्रवादी). मायणी गणातून अनिता नारायण कोळी (भाजप), साधना नामदेव पवार (भाजप), अनुसया तुकाराम गायकवाड (राष्ट्रवादी) तर कलेढोण गणातून सचिन इश्वर चव्हाण (अपक्ष), पंढरीनाथ बाबुराव पवार (राष्ट्रवादी), विक्रम दादा घाडगे (अपक्ष, भाजप), प्रल्हाद दादासो सावंत (अपक्ष), वस्ताद जिजाबा कठरे (भाजप, अपक्ष), प्रदीप मोहन साळुंखे (अपक्ष), प्रसाद बलभीम जुगदर (भाजप), तब्बसुम शाहनवाज काझी (वंचित), शाहनवाज मुसा काझी (वंचित) यांनी अर्ज दाखल केले आहेत.