सातारा : श्रावण मासारंभानिमित्त दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे महिलांसाठी मंगळवार दि.5 ऑगस्ट रोजी दु. 2 वाजता झी मराठी श्रावण सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थितांना झी मराठी वाहिनीवरील शरयू सोनावणे (पारु), नितीश चव्हाण (सूर्यादादा), ईशा संजय (राजश्री) या सुप्रसिद्ध कलाकारांना भेटण्याची संधी मिळणार आहे. तसेच महिलांसाठी मंगळागौर खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.
या श्रावण सोहळ्याचे खास आकर्षण आहे, झी मराठी वाहिनीवरील कलाकार, वारी, श्रावण गाणी व पारंपारिक खेळ. महिलांना श्रावण मासातील देखण्या कलाविष्कारांचा आनंद लुटता येणार आहे. यावेळी झी मराठी वरील मालिकांवरील कलाकारांबरोबर हितगुज करण्याची संधी मिळणार आहे. तसेच महिला मंगळागौरीच्या खेळांचे सादरीकरण करणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित महिलांना भरपूर मनोरंजनाची संधी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी 9172840739 येथे संपर्क साधावा, असे आवाहन दै.‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे करण्यात आले आहे.
दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबची नवीन वर्षातील सभासद नावनोंदणी कार्यक्रमादरम्यान सुरु होत आहे. नावनोंदणी करताच सभासदांना मिळणार बॉस कंपनीचा तीन कप्प्यांचा स्टेनलेस स्टील टिफीन हे हमखास रिटनगिफ्ट आहे. त्यासोबतच पहिल्या 1000 सभासदांना श्वेता फॉर्मिंग ज्वेलरी कडून 500 रुपये किंमतीच्या बांगड्या व तनिष फॉर्मिंग ज्वेलरीतर्फे 300 रुपये किंमतीचे दागिन्यांचे कूपन मिळणार आहे. पहिल्या 500 सभासदांना काटदरे मसाले यांच्याकडून 20 चटण्यांचा कॉम्बोपॅक, तसेच 6 हजार 600 रुपयांचे सेवा कूपन्स मिळणार आहेत. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी 9172840739 वर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपर्क साधावा.