Crime pudhari
सातारा

Satara Crime: लग्नाला नकार दिल्याने युवकाचा सत्तुरीने हल्ला

साताऱ्यातील बोगदा परिसरात मैत्रिणीसोबत मटण आणायला गेलेल्या युवतीवर एकतर्फी प्रेमातून सत्तुरीने हल्ला करण्यात आला

पुढारी वृत्तसेवा

सातारा : साताऱ्यातील बोगदा परिसरात मैत्रिणीसोबत मटण आणायला गेलेल्या युवतीवर एकतर्फी प्रेमातून सत्तुरीने हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर संशयित युवकाने स्वत:वरही वार करून जखमी करून घेतले. या थरारक घटनेने परिसर हादरुन गेला असून, करंडी (ता. सातारा) येथील युवकावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अमोल जाधव (रा. करंडी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. हल्ल्याची घटना 17 मे रोजी सकाळी 11 वाजता बोगदा येथील परिसरात घडली आहे. तक्रारदार युवती उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी सातारा तालुक्यातील एका गावात आली होती. गेल्या काही महिन्यांपासून संशयित अमोल हा युवतीला वारंवार फोन व मेसेज करत होता. युवतीने फोन करू नको, असे सांगितल्यानंतरही संशयित युवतीला मानसिक त्रास देऊन धमकी देत होता. 17 मे रोजी युवती मैत्रिणीसोबत साताऱ्यात मटण आणण्यासाठी आली होती. त्यावेळी मटण दुकानाच्या परिसरात संशयित युवकही तेथे आला.

‌‘माझ्यासोबत तू लग्न कर,‌’ असे म्हणत संशयिताने पुन्हा तेथे गोंधळ घातला; पण युवतीने लग्नासाठी नकार दिला. संतप्त झालेल्या अमोल याने मटण दुकानातील सत्तूर घेतला व थेट युवतीवर हल्ला चढवला. यामध्ये युवतीच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. या हल्ल्याने युवतीसह मैत्रीण घाबरली व मदतीसाठी याचना करू लागल्या. यानंतर संशयिताने सत्तुरीने स्वत:वरही हल्ला करत जखमी करून घेतले.

अचानक झालेल्या या घटनेनंतर परिसरात गर्दी झाली. जखमी युवतीला परिसरातील रुग्णालयात दाखल केले. याबाबतची माहिती युवतीच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी उपचार करून पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT