pudhari photo
सातारा

Satara Marital dispute case: पत्‍नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून तरुणाने जीवन संपवले

पत्‍नीचे इतर व्यक्तीसोबत असलेले प्रेमसंबंध आणि त्यातून होणारा मानसिक व शारीरिक छळ असह्य

पुढारी वृत्तसेवा

पिंपोडे बुद्रुक : पत्‍नीचे इतर व्यक्तीसोबत असलेले प्रेमसंबंध आणि त्यातून होणारा मानसिक व शारीरिक छळ असह्य झाल्याने नांदवळ (ता. कोरेगाव) येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वाठार पोलिस ठाण्यात मृत युवकाची पत्‍नी व तिच्‍या प्रियकरावर गुन्‍हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित प्रियकराला सिंधुदुर्ग येथून अटक केली.

याबाबत वाठार स्टेशन पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धीरज सुभाष पवार (वय ३१, रा. नांदवळ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दि. १२ एप्रिल २०२६ ते १९ जून २०२६ या कालावधीत ही घटना घडली. धीरजच्‍या पत्‍नीचे गौरव राणे नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचे धीरज याला समजले होते. या कारणावरून गौरव राणे हा वारंवार धीरज याला फोन करून शिवीगाळ करत होता आणि जीवे मारण्याची धमकी देत होता.

याव्यतिरिक्त धीरजची पत्‍नीही आपल्या आईला दरमहा ५००० रुपये देणे आणि स्वतःच्या कर्जाचा ३००० रुपयांचा हप्ता भरण्यासाठी धीरज याच्यावर सतत दबाव आणून मानसिक त्रास देत होती. पत्‍नी व गौरव राणे यांच्या त्रासाला कंटाळून अखेर धीरजने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. यावेळी बेडरूममध्‍ये धीरजने लिहलेली चिठ्ठी आढळून आली. याप्रकरणी सूरज सुभाष पवार यांनी फिर्याद दिली. त्‍यानुसार धीरजची पत्‍नी व तिचा प्रियकर गौरव राणे यांच्‍यावर आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्‍याप्रकरणी गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT