खटावच्या उत्तर भागात मुसळधार  
सातारा

Satara Rain : खटावच्या उत्तर भागात मुसळधार

नेर, बुध, पुसेगाव, वर्धनगड पट्ट्यात पाऊस : नदीसह ओढे, बंधारे झाले तुडुंब

पुढारी वृत्तसेवा

खटाव : जून महिना संपत आला तरी चातकाप्रमाणे वाट पहायला लावणारा मान्सून अखेर खटाव तालुक्याच्या उत्तर भागात रविवारी दमदारपणे सक्रिय झाला. नेर, बुध, पुसेगाव, विसापूर, फडतरवाडी आणि वर्धनगड पट्ट्यात जोरदार सरी कोसळल्याने येरळा नदीसह ओढे, बंधारे तुडुंब भरुन वाहिले. उशीरा का होईना जलधारा बरसल्याने या भागातील बळीराजा आनंदला आहे.

सर्वत्र मान्सूनला पोषक वातावरण निर्मिती झाली असली तरी अवर्षणप्रवण खटाव तालुक्यात अद्याप पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. रविवारी सकाळी ११ नंतर मात्र वातावरणात लक्षणीय बदल होवून खटाव तालुक्याच्या उत्तर भागात मान्सूनचे जोरदार आगमन झाले. नेर, बुध, वर्धनगड, विसापूर, पुसेगाव, फडतरवाडी या पट्ट्यात दीड तासापेक्षा अधिक काळ जोरदार सरी कोसळल्या. दमदार पर्जन्यवृष्टी झाल्याने या परिसरातून वाहणाऱ्या येरळा नदीला पूर आला. पूराचे पाणी पुसेगावच्या पुढेपर्यंत वाहिले. वर्धनगडावरुन ठिकठिकाणी धबधब्याप्रमाणे पाण्याचे लोट वाहिले. ओढे, नाले आणि बंधारे तुडुंब झाले. उशीरा का होईना चांगला पाऊस सुरु झाल्याने या भागातील शेतकरी आनंदीत झाले आहेत. बळीराजाच्या खरिपाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT