Water Tanker Pudhari
सातारा

Satara Water Shortage : जिल्ह्यात ३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

माण, खटाव आणि फलटण या तीन तालुक्यांमधील ३९ गावे आणि २३६ वाड्यांमधील ५४, २५७ नागरिक आणि ४१,१०७ पशुधनाची तहान भागवण्यासाठी पाणीपुरवठा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव आणि फलटण या तीन तालुक्यांमधील ३९ गावे आणि २३६ वाड्यांमधील ५४, २५७ नागरिक आणि ४१,१०७ पशुधनाची तहान भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सुमारे ३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये १ शासकीय आणि ३४ खासगी टँकरचा समावेश असून पाण्याचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रशासनाने १६ विहिरी आणि ९ बोअरवेलचे अधिग्रहित केले आहे.

माण तालुक्याला ३१ गावे आणि २०० वाड्यांमधील ४५,७०२ लोकसंख्या बाधित झाली आहे. माण तालुक्यात ३८,९७२ पशुधन देखील बाधित असून तेथे १ शासकीय व २९ खाजगी अशा एकूण ३० टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे, तसेच १० विहिरी आणि ६ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या तालुक्यात दहिवडी, शिंगणापूर, म्हसवड, मार्डी, वरकुटे मलवडी, मलवडी, आंधळी आणि कुकुडवाड वर्तुळातील गावांना टँकरने पाणी दिले जात आहे.

खटाव तालुक्यातील ७ गावे आणि ३६ वाड्यांमधील ७,८३३ नागरिकांना ४ खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. खटावमध्ये ६ विहिरी आणि ३ बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या असून मायणी, कातरखटाव, बुध आणि कलेढोण परिसरातील गावांमध्ये पाण्याचे वाटप केले जात आहे. फलटण तालुक्यातील दुधेबावी मंडळातील एका गावातील ७२२ नागरिकांसाठी १ खाजगी टँकर सुरू करण्यात आला आहे. सध्या प्रशासन टंचाईग्रस्त भागांत टँकरच्या फेऱ्या आणि विहिरींच्या अधिग्रहणाद्वारे नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT