सातारा

Satara water crisis: ऐन पावसाळ्यात ११३ टँकरने पाणीपुरवठा; जिल्ह्यात १२० गावे व ४०३ वाड्यांमध्ये पाणी टंचाईच्‍या झळा तीव्र

गावोगावी पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. गावोगावी पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यातील १२० गावे व ४०३ वाड्यांमधील १ लाख ६० हजार ४६४ नागरिक व १ लाख ३१ हजार ४४२ जनावरांना ११३ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास टंचाईग्रस्त गावे वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

जिल्ह्यात यंदा कडक उन्हाळा झाला. फेब्रुवारी महिन्यापासून तीव्र उन्हाळा सुरू झाला असल्याने पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. विहिरी, नद्या, नाले, ओढे, तलाव, धरणे कोरडी ठाक पडली आहेत. भूजल पातळी घटल्याने गावोगावी नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. माण तालुक्यातील बिजवडी, पाचवड, पांगरी, येळेवाडी, मोगराळे, वडगाव. जाधववाडी, राजवडी, तोंडले, अनभुलेवाडी, थदाळे, मोही, दानवलेवाडी, हस्तनपूर, डंगिरेवाडी, वावरहिरे, संभूखेड, कारखेल, वरकुटे म्हसवड, पर्यंती, धुळदेव पळशी,पिंगळी बु., पिंगळी खुर्द, मार्डी, इंजबाव, खुटबाव, भालवडी यासह ४७ गावे व २८१ वाड्यांमधील ६३ हजार ६१५ नागरिक व ९१ हजार ७८४ जनावरांना ४९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

खटाव तालुक्यातील सुर्याचीवाडी, दातेवाडी, मोराळे, एनकूळ, कणसेवाडी, खातवळ, यलमरवाडी, तडवळे, गारवडी, मोळ, मांजरवाडी, शिंदेवाडी, रणसिंगवाडी, नवलेवाडी, पांढरवाडी, कातळगेवाडी, रेवलकरवाडी. जाखणगाव, कोकराळे, अंभेरी यासह ३० गावे व ५८ वाड्यांमधील ३६ हजार १२८ नागरिक व ५ हजार ३३७ जनावरांना १९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव तालुक्यातील बिचुकले, विखळे, फडतरवाडी, चवणेश्‍वर, मोरबेंद, नायगाव, अनपटवाडी. सोळशी. पिंपोडे बु., रणदुल्लाबाद, अंबवडे स. वाघोली, गुजरवाडी, हासेवाडी, नागेवाडी, बोधेवाडी, चिलेवाडी, शेल्टी, भांडारमाची, बोरजाईवाडी, तळीये, जाधववाडी, भावेनगर, करंजखोप यासह २३ गावांमधील ३१ हजार ९१ नागरिक व १७ हजार ६१० जनावरांना १८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

पाटण तालुक्यातील एका गावासह ७ वाड्यांना, खंडाळा तालुक्यातील गोळेगावला एका टँकरने, फलटण तालुक्यातील ९ गावे व ४८ वाड्यांना ९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. महाबळेश्वर तालुक्यातील २ गावे व एका वाडीला २ टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT