तळ्यात बुडून मृत्यू,www.pudhari.news 
सातारा

Satara Water Park Accident : वॉटर पार्कमध्ये युवकाचा मृत्यू

लिंब -ढगेवाडी येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

सातारा: लिंब -ढगेवाडी (ता.सातारा) येथे असलेल्या जलधारा वॉटरपार्क येथे ऋषीकेश गोपाळ साळुंखे (वय 27, रा. कुशी, नागेवाडी ता.सातारा) या युवकाचा मृत्यू झाला. दि. 17 मे रोजी दुपारी ही घटना घडली आहे.

ऋषीकेश साळुंखे हा वॉटर पार्कमधील पाण्यात असताना त्याला त्रास होवू लागला. ही बाब इतरांच्या लक्षात आली. यामुळे तात्काळ त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र तो बेशुध्द झाला. उपचारासाठी सिव्हीलमध्ये दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. सातारा तालुका पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. ऋषीकेश हा साताऱ्यात वेल्डर म्हणून काम करत आहे. तो अविवाहित असून त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. सिव्हीलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले असून अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT