सातारा

Wai Laghukumbh Mela: लघुकुंभमेळ्याने वाईनगरी भक्तिरसात न्हाली

दक्षिण काशीची महती राज्यभर पसरणार : ना.जयकुमार गोरे

पुढारी वृत्तसेवा

वाई : वाई नगरीला ‌‘दक्षिण काशी‌’ म्हणून ओळखले जाते. कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या या ऐतिहासिक नगरीत आयोजित केलेल्या लघुकुंभमेळ्याला गुरुवारी धार्मिक व भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला. साधूसंत व महंत यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या सोहळ्याने दक्षिण काशी भक्तिरसात चिंब झाली. या मेळ्याच्या शुभारंभप्रसंगी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी वाईच्या कुंभमेळ्याची महती संपूर्ण महाराष्ट्रात पसरणार असल्याचे सांगितले.

अवघं वाई शहर धार्मिक कार्यक्रमांमुळे तल्लीन झाले असून साधूसंतांच्या वास्तव्याने ही नगरी पावन झाली आहे. भगवान शंकर व महागणपती यांच्या प्रतिमांचे पूजन करून लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ झाला उद्घाटनप्रसंगी गुजरात येथील परमपूज्य महंत महादेवगिरी महाराज, योगेंद्रगिरी महाराज, नगराध्यक्ष अनिल सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, युवा नेते विराज शिंदे, पंचायत समिती सदस्य स्वप्निल गायकवाड, उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के, विरोधी पक्षनेते विजय ढेकाणे, प्रदेश उपाध्यक्ष सचिन घाटगे, मंदिर महासंघ तालुकाध्यक्ष श्रीधर भाडळकर, काशिनाथ शेलार, ॲड. दीप्ती पिसाळ, जितेंद्र पिसाळ, सचिन सावंत, निलेश मोरे, प्रवीण जाधव, निखिल जाधव यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, साधुसंत, भाविक व नागरिक उपस्थित होते.

ना. गोरे म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून आयोजक, साधुसंत, नगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक व कार्यकर्ते या कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा धार्मिक सोहळा भव्य स्वरूपात पार पडत आहे. ‌‘2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या भव्य कुंभमेळ्यासाठी देशभरातून कोट्यवधी भाविक येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन आवश्यक सुविधा उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे.

यावेळी गुजरात अटल धामचे महंत महादेवगिरीजी महाराज यांनी धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात एकात्मता वाढत असून हिंदुत्ववादी विचारांना बळ मिळते, असे सांगितले. मुख्य आखाड्याच्या वतीने ना गोरे व नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा सत्कार झाला. तसेच नगराध्यक्ष अनिल सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित साधुसंतांचे स्वागत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT