वाई : सिद्धनाथवाडीतील माजी नगरसेवक कांताराम जाधव यांच्या मुलावर जुन्या भांडणाच्या रागातून त्याच परिसरातील काही जणांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये अक्षय कांताराम जाधव युवक गंभीर जखमी झाला आहे. यामध्ये काठ्या, रॉड व कोयत्याचा वापर करण्यात आला आहे. याप्रकरणी वाई पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
अजय मच्छिंद्र धोत्रे, विजय मच्छिंद्र धोत्रे, प्रेमजीत संतोष पवार, शुभम बाजीराव जाधव, मनोज अमर जाधव, विकास जाधव (सर्व रा. गुरेबाझार झोपडपट्टी सिद्धनाथवाडी वाई) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
शनिवार दि. 12 रोजी रात्री सिद्धनाथवाडीतील मारुती मंदिराच्या शेजारी अक्षय कांताराम जाधव, संदीप सतीश वाघे, समीर मुकणे हे बोलत उभे होते. यावेळी संशयितांनी अक्षयला शिवीगाळ करत तुम्हाला लय मस्ती आलेली आहे. आता तुम्हाला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत बरोबर आणलेल्या कोयता व दांडक्याने जरब मारहाण केली. यामध्ये संशयितांनी कोयत्याने डोक्यात मारल्याने अक्षय गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे.