सातारा

Satara Crime : वाहने चोरणार्‍या तिघांच्‍या टोळीला अटक

चोरीच्या चार मोटारसायकली तसेच गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा ३ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

सातारा : शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोटारसायकल चोरीचा छडा लावला. शाहूपुरी हद्दीतील दोन आणि मेढा हद्दीतील दोन असे चार गुन्हे उघडकीस आणत तिघांना अटक करण्यात आली. चोरीच्या चार मोटारसायकली तसेच गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा ३ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

जगदीश दत्तात्रय दळवी (वय १९, रा. म्हाते ता.जावली), विक्रम् शिवाजी भांडवलकर (वय २१, रा. ठाकुरकी फलटण), गौरव आनंदा कदम (वय २२) अशी संशयितांची नावे आहेत. शाहूपुरी पोलिस ठाण्यात दि. ३० ऑगस्ट रोजी दुचाकी चोरीची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. १८ सप्टेंबर रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळालेल्या माहितीनुसार मोळाचा ओढा परिसरातून एका संशयिताला मोटारसायकलीसह ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत त्याने मोटारसायकल चोरीची कबुली देत आणखी एक साथीदार असल्याचे सांगितले. पोलिसांनी कारवाईच्या दुसर्‍या टप्‍प्‍यात एसटी स्टँड परिसरातून दुसऱ्या संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन आणि मेढा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन मोटारसायकली चोरी केल्याची माहिती दिली. या प्रकरणात एकूण तीन संशयित आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत.

पोनि संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शैलेंद्र गोवेकर, पोलिस सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, सुमित मोरे, संग्राम फडतरे, विशाल धुमाळ, रोहित बाजारे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT