theft case Pudhari Photo
सातारा

Satara Theft Case: उंब्रजमध्ये घरफोडी; दीड लाख लंपास

घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घरामधून सुमारे दीड लाखाची रक्कम लंपास केली

पुढारी वृत्तसेवा

उंब्रज : घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घरामधून सुमारे दीड लाखाची रक्कम लंपास केली आहे. उंब्रज (ता. कराड) येथे भरवस्तीत घडलेल्या घटनेनंतर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

शुक्रवारी मध्यरात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली असून याप्रकरणी सुनील विष्णू मोहिरे यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, २ जुलैला पाचगणी येथे लग्न कार्यासाठी मोहिरे कुटुंबातील सर्वजण गेले होते. लग्न झाल्यावर शुक्रवारी रात्री १२.१५ वाजण्याच्या घरी परतले. त्यावेळी घराच्‍या पाठीमागील दरवाजाची कडी निघालेली दिसली.

त्यानंतर बेडरुममधील दोन गोदरेज कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच कपाटातील तिजोरीत दुकान व्यवसायाचे १ लाख ५० हजारांची रोख रक्कम चोरीला गेली असल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर संशयितांच्‍या शोधासाठी घटनास्थळी सातारा येथील डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT