सातारा

Satara Theft : दुचाकी चोरट्याकडून ६ वाहने जप्‍त; सराईत माण तालुक्‍याचा

शहर पोलिसांची कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा शहर, कराड, दहिवडी परिसरातून दुचाकी चोरणार्‍या सराईत चोरट्याला मिरज जि.सांगली येथून गुन्‍हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने (डीबी) अटक केली. संशयिताकडून चोरीची ६ वाहने जप्‍त केली. अभिजीत भरत पवार (वय ३२, रा. शेरेवाडी, ता. माण, जि. सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दि. ७ सप्टेंबर रोजी गोडोली येथील साईबाबा मंदिर परिसरातून एक दुचाकी चोरी झाली होती. शहर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाल्‍यानंतर डीबीचे पोलिस तपास करत होते. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांना संशयिताची माहिती मिळाली. तो वाहन चोरीतील सराईत आरोपी असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पथकाने विविध ठिकाणी छापे टाकले. दोन दिवस त्याच्या मागावर राहिल्यानंतर गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला मिरज येथून ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी त्‍याच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्‍याने मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. चोरीच्या मोटारसायकली विक्रीच्या उद्देशाने लपवून ठेवल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याने दाखवलेल्या ठिकाणाहून ६ मोटारसायकली जप्त केल्या. सर्व दुचाकी कराड शहर, दहिवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे समोर आले आहे.

पोनि सचिन म्हेत्रे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुधीर मोरे, पोलिस निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, सुशांत कदम, सुहास कदम, वैभव माने, मच्छिंद्रनाथ माने, सचिन रिटे, संतोष घाडगे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

चेसी नंबर खोडले

संशयित आरोपी हा सराईत गुन्‍हेगार असून त्‍याच्यावर याअगोदर ८ गुन्‍हे दाखल झालेले आहेत. पोलिसांनी जप्‍त केलेल्‍या वाहनांचे चेसी नंबर व इंजिन नंबर खोडल्‍याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT