सातारा

Satara Theft : दुचाकी चोरली मग ज्वेलर्स दुकान फोडले

दोन गुन्‍ह्यांची उकल : शहर पोलिसांकडून दोघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातार्‍यातील शेटे चौकातील ज्वेलर्स दुकानाचे शटर उचकटून त्‍यातून तब्बल ९ लाख १५ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरणार्‍या टोळीने या चोरी अगोदर दुचाकी चोरल्‍याचे समोर आले. एका कारवाईत दोन गुन्‍ह्यांची उकल सातारा शहर पोलिसांनी केली.

रेहान अन्‍वर शेख (वय २०, रा.शनिवार पेठ, सातारा) व शुभम सुरेश हदगे (वय १९, रा. केसरकर पेठ, सातारा) अशी संशयितांची नावे असून अल्‍पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. याप्रकणी अक्षय अंकुश शिंदे (वय ३१, रा. पाटखळ ता.सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ज्वेलर्स दुकान फोडीची घटना दि. ७ ऑक्‍टोबर रोजी मध्यरात्री घडली. संशयित तिघांच्या टोळीने अवधूत ज्वेलर्स दुकानाचे शटर उचकटले. दुकानातून चोरट्यांनी सोने, चांदी, डीव्‍हीआर, सीसीटीव्‍ही असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरला. चोरी केल्‍यानंतर चोरटे दुचाकीवरुन रफादफा झाले. पोलिस शहरातील सीसीटीव्‍हीचा शोध घेत असताना त्‍यांना संशयित एकाठिकाणी कैद झाले. त्‍यानुसार संशयितांची उचलबांगडी केल्‍यानंतर त्‍यांनी चोरीची कबुली दिली. चौकशीदरम्‍यान, ज्वेलर्स दुकान फोडल्‍याचे व त्‍याचवेळी दुचाकी चोरल्‍याचेही समोर आले.

एसपी निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडूकर, डीवायएसपी विपुल पाटील, पोनि सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे सपोनि सुधीर मोरे, फौजदार अनिल जायपत्रे, पोलिस निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, समीर महागडे, पंकज मोहिते, पो.कॉ.तुषार भोसले, सागर गायकवाड, सुहास कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, वैभव माने, सुशांत कदम यांनी कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT