बॉम्बे रेस्टाॅरंट मार्गावर वारंवार कोंडी 
सातारा

Satara News : बॉम्बे रेस्टाॅरंट मार्गावर वारंवार कोंडी

वाहनांच्या लांबच्या लांब रांगा : वाहनचालकांसह नागरिक त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा शहर परिसरात रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय ते बॉम्बे रेस्टाॅरंट मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांसह नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय ते बॉम्बे रेस्टाॅरंट मार्गावर रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. नेमक्या याच मार्गावर जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, एलआयसी कार्यालय, विविध बँका, जिल्हा न्यायालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ ऑफीस, जिल्हा परिषद अशी विविध कार्यालये आहेत. तसेच शाळा व महाविद्यालयेही आहेत. त्यामुळे या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. मात्र रस्त्याच्या कामामुळे एक मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वारंवार होत आहे. वाहतूक पोलिसांच्या मदतीने कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला असला तरी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत.

वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांसह नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. वाहनचालक अन्य पर्यायी मार्गाचा वापर करत आहेत. त्या मार्गावरही वाहतूक कोंडी होत आहे. तर काही ठिकाणी वाहतूक पोलिसांनी बॅरेकेट लावून मार्ग बंद केले आहेत. त्या ठिकाणीही वाहतूक कोंडीसारखे प्रकार होत आहेत. त्यामुळे वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ते बॉम्बे रेस्टाॅरंट हा मार्ग वर्दळीचा असल्याने रस्त्याची कामे संबंधित विभागांनी रात्रीच्या वेळी करावीत, अशी मागणी वाहनचालकांसह परिसरातील नागरिक व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT