सातारा

सातारा : कास पठारावर आता मिकी माऊसचा बहर

दिनेश चोरगे

बामणोली; पुढारी वृत्तसेवा :  जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पुष्प पठारावरील फुलांचा यावर्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून सध्या कास पुष्प पठारावर मिकी माऊस या पिवळ्या फुलांचा साज पाहावयास मिळत आहे. कास पुष्प पठाराला दि. 15 ऑक्टोबरअखेर सुमारे 1 लाख पर्यटकांनी भेट दिली.

कास पुष्प पठारावर रंगीबेरंगी विविध प्रजातींची फुले उमलण्यास जुलैनंतर सुरुवात होते. दरवर्षी 1 सप्टेंबर रोजी कास पुष्प पठारावरील फुलांच्या हंगामाला सुरुवात होते. साधारणत: एक ते दीड महिना हा पर्यटन हंगाम चालतो. यावर्षी सात वर्षानंतर पठारावर उमललेली टोपली कारवी ही पर्यटकांचे आकर्षण ठरली. कास पुष्प पठारावर सध्या केवळ मिकी माऊसची फुले दिसत आहेत. तर कास पठार कार्यकारी समितीने येथील ऑनलाईन बुकिंग बंद केले आहे, असे सांगण्यात आले. ऑफलाईन बुकिंग हे सुरू राहणार आहे. अंतिम टप्प्यात आलेला कासचा हंगाम अजूनही 20 ते 25 दिवस चालेल, असे समिती व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले. अद्यापही अनेक पर्यटक कास पुष्प पठारावरील फुले पाहण्यासाठी येथे येत आहेत.

कास पुष्प पठाराबरोबरच येथील इतर प्रजातींची फुले व कुमुदिनी तलाव पाहून पर्यटक इतर ठिकाणेही पाहत आहेत. कास पुष्प पठार कार्यकारी समितीने सुरू केलेली जंगल सफारी देखील पर्यटकांना अनुभवता येणार आहे. येथे तयार करण्यात आलेले छोटे मोठे पॉईंटदेखील पर्यटकांसाठी खुले असणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT