सातारा

Satara Crime: थरारक पाठलागानंतर दोघे लुटारू गजाआड­

टोळीला फलटण पोलिसांचा दणका; तिघे फरार

पुढारी वृत्तसेवा

फलटण : मांडवखडक (ता. फलटण) येथे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर फलटण ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागताच पळ काढलेल्या संशयितांचा सुमारे दोन किलोमीटर पाठलाग करून दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून लुटमारीसाठी वापरण्यात येणारा मुद्देमाल जप्त केला.

राहुल नाना घुले (रा. इंदिरानगर, फलटण) आणि नंदकुमार भागोजी सोनवणे (रा. झिरपवाडी, ता. फलटण) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, टोळीतील अन्य तीन संशयित फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.

मांडवखडक परिसरात नागरिकांना लुटण्याच्या उद्देशाने काही संशयित एकत्र आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली असता संशयितांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडण्यात यश मिळविले. अटक संशयितांकडे केलेल्या चौकशीतून फलटण ग्रामीण भागातील आणखी चोरी व लूटमारीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT