Satara Theft News: ल्हासुर्णेत घरफोडी ; साडेसात तोळे लांबवले File Photo
सातारा

Satara Theft News: ल्हासुर्णेत घरफोडी ; साडेसात तोळे लांबवले

तब्बल 1 लाख 93 हजार रूपयांचा मुद्देमाल लांबवला

पुढारी वृत्तसेवा

कोरेगाव : ल्हासुर्णे, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत घरफोडी झाली. या घरफोडीत साडे सात तोळे सोने व रोकड असा तब्बल 1 लाख 93 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल लांबवला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून वैभव प्रताप शिंदे यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

घराच्या खिडकीच्या काचा काढून, बार वाकवून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यानंतर 1 लाख रूपये किमतीचा पाच तोळ्याचा कोल्हापूरी साज, 20 हजारांच्या अंगठ्या, 20 हजारांचे सोन्याचे बदाम, सोन्याची नथ, चांदीचे करगुटे, पायातील पट्ट्या,चांदीच्या बिंदल्या व रोख 41 हजार 300 असा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT