सातारा : स्वत:च्या घरी मित्रासोबत चोरी करणार्या दोघांचा सातारा तालुका पोलिसांनी पर्दाफाश करुन अटक केली. चोरीतील सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 31 ऑगस्ट रोजी सौ. हेमा विलास मोरे (रा. बेबलेवाडी ता.जि.सातारा) यांनी घरातून त्यांचे 7 तोळे सोने दागिने चोरी झाल्याची पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तालुका पोलिस तपास करत असताना सुरुवातीला याप्रकरणात तक्रारदार यांच्या मुलाला अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने मित्रासोबत चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक करुन चोरीतील सोने जप्त केले. पोलिसांनी चोरीतील सर्व सोने जप्त केले आहे.
पोनि निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विनोद नेवसे, पोलिस मनोज गायकवाड, पंकज ढाणे, विद्या कुंभार, राजू शिखरे, शिवाजी वायदंडे, दादा स्वामी, प्रदीप मोहिते, संदिप पांडव, होमगार्ड वरद गायकवाड यांनी कारवाईत सहभाग घेतला.