कराड : संशयितांपैकी एकाकडून जप्त केलेल्या चोरीच्या सहा दुचाकी. Pudhari Photo
सातारा

Satara Theft: दुकान फोडणार्‍याकडून चोरीच्या 6 दुचाकी हस्तगत

कराड शहर पोलिसांचे यश; संशयित गजाआड

पुढारी वृत्तसेवा

कराड : दुकानातील चोरीचा छडा लावत असतानाच याच प्रकरणातील संशयिताकडून या चोरीसह दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. कराड शहर पोलिसांनी दुकानातील साहित्यासह चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत. तिन्ही संशयित युवकांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी दिला आहे. जय जाधव, अनिकेत गवते आणि ओम गवते अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी, पुणे - बंगळूर महामार्गालगत नांदलापूर गावच्या हद्दीत एका हार्डवेअरच्या दुकानात चोरी झाली होती. याबाबत कराड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक भापकर यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांना संशयितांचा शोध सुरू केला. संशयितांबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिन्ही संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत आणि त्यांच्याकडून दुकानातील चोरीचे साहित्य हस्तगत केले.

दरम्यान, या संशयितांपैकी एकाचा दुचाकी चोरीत हात असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. पोलिसांनी या दुचाकी जप्त केल्या आहेत. सद्यस्थितीत अन्य दोन संशयितांचा यात सहभाग आहे अथवा नाही? याची सत्यता पोलिसांकडून पडताळली जात आहे. तसेच आणखी कोणी साथीदार आहेत का? याचीही माहिती घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT