Satara Cold Wave Pudhari
सातारा

Satara Cold Wave : सातारा १२ अंशांवर, जनजीवनाला कापरं

उत्तर भारतातून येणार्‍या थंड वार्‍यांमुळे राज्यात अनेक भागांत तापमानाचा पारा घसरला

पुढारी वृत्तसेवा

सातारा : उत्तर भारतातून येणार्‍या थंड वार्‍यांमुळे राज्यात अनेक भागांत तापमानाचा पारा घसरला आहे. तापमान कमालीचे घटल्याने जिल्ह्यात हुडहुडी वाढली आहे. बोचर्‍या थंडीमुळे अवघे जनजीवन गारठले असून, शनिवारी सातार्‍याचे तापमान १२ तर महाबळेश्वरचे तापमान ९ अंशांपर्यंत नोंदवलेे. या वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक जागोजागी शेकोट्या पेटवून ऊब घेताना दिसत आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर जिल्ह्यात थंडीचे आगमन झाले आहे. अवघ्या काहीच दिवसांत पारा घसरू लागला आहे.

शेकोटीसाठी लाकूडफाट्याची जमवाजमव...

थंडीचा जोर वाढला असून, आंध्र प्रदेश व ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीवरील अक्वान चक्रीवादळाच्या परिणामामुळे हवामान खात्याने राज्यात पावसाचे संकेत दिले आहे. त्यामुळेच थंडीचा कडाका ही वाढला आहे. पुढील काही दिवस तो कायम राहण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेकोटीची गरज वाढणार आहे. सध्या ग्रामीण भागातही चूल गायब झाल्याने लाकूडफाटा जमवला जात नाही. मात्र थंडीमुळे शेकोटीसाठी लाकूडफाटा, पाला-पाचोळा, पुट्टे आदींची आवर्जून जमवाजमव केली जातेय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT